▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬
श्री विश्वकर्मीय श्रमिक क्रांती संघ
▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬ विभागीय कारागीर मेळावा-२०१८💢
श्री विश्वकर्मीय श्रमिक क्रांती संघ
▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬ विभागीय कारागीर मेळावा-२०१८💢
मराठवाडा-विदर्भ
विभाग
कारागीर
मेळावा,
औरंगाबाद
:
समाजप्रेमी बांधवानो, सस्नेह जय श्री प्रभू विश्वकर्मा ! सर्व प्रथम आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..स्वातंत्र्याच्या या पर्वात महाराष्ट्र राज्यातील श्री विश्वकर्मीय समाज चळवळीस समाजहिताच्या न्याय-हक्क,मागण्यासाठी संविधानिक पद्धतीने दिशादर्शक व कार्यशील करण्यासाठी समाजातील बहुसंख्य घटक असलेल्या श्रमिक, कारागीर वर्गांच्या समाजहिताचे कार्यध्येय ठेवून "श्री विश्वकर्मा श्रमिक संघाच्या-दुसऱ्या कारागीर मेळाव्याचे आयोजन मराठवाडा व विदर्भाच्या केंद्रस्थानी औरंगाबाद येथे घेण्याचा संकल्प आज आपण सर्वांच्या साक्षीने करीत आहोत. उपक्रमाची तारीख व स्थान निश्चित केल्यानंतर जाहीर करण्यात येईल.
संकल्पना व उपक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे ठरविण्यात येईल :
संकल्पना : श्री विश्वकर्मीय समाजातील बहुसंख्य असलेल्या श्रमिक,कारागीर वर्गाना एकत्र करून "श्रमिक चळवळ" उभी करण्याची स्पष्ट संकल्पना या मेळाव्यामधून साकार होणार आहे. श्री विश्वकर्मीय श्रमिक कारागीर वर्गाला कौशल्यवान कारागीर हा स्वतंत्र दर्जा मेळावा व त्यांच्या समाजकल्याण व व्यावसायिक विकासासाठी शासनाने धोरण ठरवावे या विषयावर या मेळाव्यातून विचार मंथन व भविष्यकाळातील कार्यदिशा यावर सविस्तर विचार मंथन करण्यात येईल.
तसेच सध्याच्या विविध शासकीय योजना, कामगार नोंदणी, खादि ग्रामउद्योग आयोग,प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महामंडळ व मुद्रा या स्वरूपाच्या भांडवल पुरवठा करणाऱ्या योजनांची माहिती त्या त्या क्षेत्रातील मान्यवर,अभ्यासक व अधिकारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतून समाज बांधवाना देण्याची संकल्पना या मेळाव्यातून साकारणार आहे. तसेच समाजबांधवांच्या प्रोत्सहन करीता हस्तकला प्रदर्शनाचे आयोजनासह व्यावसायिक प्रगती साठी अत्याधुनिक मशनरीज, विविध साहित्य यांचे प्रदर्शन हि आयोजित करण्यात येईल.
संयोजन : सदरील मेळाव्याचे संयोजन मराठवाडा व विदर्भ विभागातील जेष्ठ समाजप्रेमी मार्गदर्शक,सक्रिय कार्यसेवक व समाजबांधव यांच्या सहकार्याने श्री विश्वकर्मा श्रमिक संघ या कामगार संघातर्फे करण्यात येईल. या मेळाव्याचे नेतृत्व हे समाजातील कार्यकर्ते म्हणून सर्व बांधव करतील. या साठी कोणतेही व्यक्तिगत पद,प्रतिष्ठा किंवा संघटनावाद पुढे येणार नाही.
सहभाग : या उपक्रमामध्ये समाजातील श्रमिक, कारागीर वर्ग व त्या त्या भागातील सामाजिक संस्था यांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच समाजातील सक्रिय समाजप्रेमी कार्यकर्ते व समाजबांधव यांना आमंत्रित केले जाईल.
व्यासपीठ व विषय : सदरील उपक्रम हा केवळ समाजातील श्रमिक, कारागीर वर्गाना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी असल्याकारणाने केवळ त्यांच्या हिताच्या संबंधितच चर्चा या व्यासपीठावरून करण्यात येईल. त्यासाठी कामगार व व्यावसायिक क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक, शासकीय अधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येईल.
प्रेषक व आर्थिक मदत : सदरील उपक्रमाचे प्रेषक प्रसिद्धी "श्री विश्वकर्मा समाज, मराठवाडा व विदर्भ विभाग" असणार आहे. या उपक्रमाचे श्रेय हे समाजालाच असणार. उपक्रमाकरिता आवश्यक आर्थिक मदत व्यावसायिक डिरेक्टरी व हस्तकला प्रदर्शनातून जमा करण्यात येईल. या उपक्रमाला व्यावसाईक साहित्य पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्या व व्यावसायिक यांचेकडून प्रयोजकीय शुल्क आकारण्यात येईल. त्या सोबतच समाजातील सक्षम समाजप्रेमी बांधवांकडून देणगी स्वरूपात आलेल्या निधीचा उपयोग करण्यात येईल.
आर्थिक व्यवहार व खर्च यासाठी कारागीर प्रतिनिधींची तात्पुरती समिती समिती स्थापन करण्यात येईल व कार्यक्रमाचा जमाखर्च जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित फक्त देणगीदारांना देण्यात येईल.
समाजप्रेमी बांधवानो, मागील वर्षीचा कामगार मेळावा मा. कामगार मंत्री श्री.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली अगदी शिस्तबद्ध व समाजाच्या प्रचंड उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.मंत्री महोदयांनी आपल्या समाजाच्या बाबतीत कौशल्यवान, व प्रामाणिक असे उल्लेखून प्रभू विश्वकर्मा यांची महिमा यावर भाष्य केले. समाजाच्या न्याय-हक्क मागण्यासाठी शासनाला समयोचित विषयासह शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक असते.
हस्तकला कारागीर वर्गासाठी शासनाने राखीव ठेवलेला निधीचा
" श्री विश्वकर्मा हस्तकला व कौशल्यविकास बोर्ड"
या माध्यमातून श्री विश्वकर्मीय कारागीर बांधवाना घेता यावा व त्यासाठीचा पाठपुरावा या साठी कार्यदिशा मिळावी या करीता आपण सर्व समाजबांधवांच्या पाठबळावर या मेळाव्याचा धाडसी संकल्प केलेला आहे.
या उपक्रमाला विविध माध्यमातून जास्तीत जास्त समाज बांधव जोडावेत. उपक्रमाची संकल्पना व रुपरेषेमध्ये काही त्रुटी, नवीन सूचना आवश्यक असल्यास सुधारणा करण्यात येतील.
या उपक्रमाकरिता समाज बांधवांचा संपर्क व्हावा व प्रचार प्रसार व्हावा या करीत ऑन-लाईन संपर्क जोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी.
📧 नोंदणी https://goo.gl/forms/ahU9b8s4bdVhzIYt1 📧 ई-मेलsutaryuvakranti@gmail.com📲व्हाट्सअँप- ९५२७७८००९९
आपलाच,सैदवसमाजऋणात,
श्री.बाळासाहेब पांचाळ, नांदेड
संदेशप्रसारक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
हा उपक्रम समाजाचा असल्याकारणाने कोणतीही व्यक्तिगत ©®
नाही. ज्या बांधवाना हा मेळावा समाजहिताचा वाटतो त्यांनी स्वतःच्या नावे प्रसिद्ध करावा.हि माहिती सर्व ग्रुप व समाज बांधवा पर्यंत पोहचवा व समाज कार्यास सहकार्यकरावे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा