विश्वकर्मीय सामाजिक
परिवर्तनाचा झंजावात मराठवाड्यातून पेटला ! सुसंवाद परिवर्तन यात्रेच्या शुभारंभास
परळी तालुक्यातील समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.
दि.०१ जाने,परळी : श्री विश्वकर्मीय समाज सुसंवाद परिवर्तन
यात्रेचा शुभारंभ काल परळी येथील श्री वैद्यनाथाच्या शेजारीच असलेल्या भव्य श्री
विश्वकर्मा मंदिरात परळी तालुक्यातील समाजबांधवांच्या वतीने करण्यात आला.स्थानिक
सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व युवा मित्रांनी स्वप्रेरणेने या कार्क्रमाचे नियोजन
केले होते. समाजाशी थेट समाजरूप होऊन सामाजिक सुसंवाद साधण्यासाठी नांदेडहून युवा
क्रांती प्रमुख श्री.बाळासाहेब पांचाळ, श्री.जे.जी. पांचाळ,बाचोटीकर
साहेब (वनाधिकारी) प्रा.श्री. नागोरावजी पांचाळ,सिंधीकर सर व
बीड जिल्ह्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
परळी तालुक्यातील समाजप्रिय शिक्षक व मार्गदर्शक
श्री.अनिल पांचाळ,वडखेलकर
सर यांच्या ओघवत्या व खास शैलीतील सूत्रसंचालनाने उपस्थित असलेला प्रत्येक समाज
बांधव आपल्या सामाजिक प्रतिक्रिया मनमोकळ्या व्यक्त करीत होता. नववर्षाच्या
पहिल्याच दिवशी व तेही सामाजिक विषयावरचे आयोजन वतेही व्यक्तिप्रतिष्ठा,संघटना,हारतुरे व भाषणबाजी या प्रकाराला पुरता
गुंडाळून समाजाने समाजासाठी सामाजिक विषयावर आयोजित केलेला हा *शुद्ध सामाजिक*
प्रयोग पूर्णतः उद्देष्यपूर्ण सफल झाला.
पुढील काळात परळी येथील संपूर्ण विश्वकर्मीय
समाज हा विश्वकर्मीय समाज चळवळीत अग्रेसर राहील व सामाजिक स्वरूपाचेच उपक्रम
राबविण्यात येतील. असा निर्धार श्री.अनिल पांचाळ सर,श्री.विष्णुभाऊ साखरे, श्री.
सुधाकरजी पांचाळ या स्थानिक नेतृत्वाने केला.
कार्यक्रमाच्या आयोजनात श्री.बाळासाहेब साखरे,श्री.एकनाथ साखरे,श्री अमोल साखरे,श्री.विकास क्षीरसागर,श्री.गोविंद पांचाळ,श्री.पांचाळ सर,श्री मनोहर साखरे,श्री.रामभाऊ पांचाळ व विश्वकर्मा
मंदिर समिती व समाजातील सर्व जेष्ठ-तरुण मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.
परळी व तालुक्यातील ग्रामीण भागातील कारागीर
बांधवांची समाजातील कष्टकरी व कारागीर बांधवांची १००% कामगार नोंदणी व समाज संपर्क
नोंदणी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल त्या करीत सक्रिय सामाजिक कार्यकर्ते
श्री.भीमाशंकर साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवा मित्र मंडळाकडून प्रयत्न
केला जाणार आहे.
संवाद यात्रेचा पुढील ठिकाण सोनपेठ तालुक्यातील येथील समाज बांधवानी याच आठवड्यात आयोजित केले आहे
संवाद यात्रेचा पुढील ठिकाण सोनपेठ तालुक्यातील येथील समाज बांधवानी याच आठवड्यात आयोजित केले आहे
"आपला
समाज एकत्र येत नाही हा न्यूनगंड बाळगणे म्हणजे मानसिक भानामती आहे. व्यक्तिगत
प्रतिष्ठा व पदाची गारुड गुंडाळून ठेवून समाज निरपेक्ष भावनेने समाज जोडता
येतो."
"प्रत्येक
भागातील सक्रिय असलेल्या तळमळीच्या सच्च्या कार्यकर्तांना सोबत घेऊन समाजाच्या
पाठबळावर समाजाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर समाजकारण अधिक प्रभावी करण्याकरिता थेट
समाजाशी समाजरूप होण्याकरिता "सुसंवाद परिवर्तन यात्रा" हा झंजावात दिशा
मिळेल तिथे फिरवू."
"धार्मिक
भावना ठेवून गावोगावी मंदिरे उभी केली, आता राज्यकर्त्यांनी
समाजाच्या जीवनकल्याणाचे धोरण राबवावे या करीता संविधानात्मक मार्गाने लढा उभा
करूया.संविधानकर्त्याने आपला अधिकार लिहून ठेवला आहे.तो मिळालाच पाहिजे हिच जिद्ध
!"
"शिव
छत्रपती,महात्मा फुले,लोकराजे शाहू व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विभूती म्हणजे सत्य व मानवी जीवनमूल्यांचा जगमान्य
साक्षात्कार आहेत. त्यामुळेच विश्वकर्मीय समाजाने मनुवादी पोथ्या-पुराणाच्या व
बुद्धीला न पटणाऱ्या भाकड कथांचे पारायण करीत न बसता महापुरुषांचे विचार समजातील
सुशिक्षित बांधवांकडून आत्मसात करावे"
श्री.बाळासाहेब पांचाळ
श्री.बाळासाहेब पांचाळ
"समाजाच्या
उद्धारासाठी शिक्षण महतवाचे आहे.त्यामुळे आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खर्चिक
रूढी परंपराना दूर ठेवून आर्थिक तरतूद करावी."
"आपल्या
समाजात महापुरुषांच्या विचारधारेचे प्रबोधन नसल्यामुळे सत्तरी गाठूनही समाज
सामाजिक,राजकीय दृष्ट्या उपेक्षित राहिला आहे"
"समाजातील
सुशिक्षित बांधवांचे मार्गदर्शन व मदत मिळावी या करीता जयंत्या मध्ये भजन,भंडारे न ठेवता सामाजिक प्रबोधन,शैक्षणिक प्रोत्सहानपर
उपक्रम राबवावेत."
प्रा.श्री. नागोरावजी पांचाळ सिंधीकर सर
प्रा.श्री. नागोरावजी पांचाळ सिंधीकर सर
"समाजातील
कार्यकर्त्यांनी आपल्या समाजात ओबीसी विचारधारा व सामाजिक जागृती करावी."
"आपल्या समाजबांधवांना मदत म्हणून सामूहिक भागीदारीने व्यवसाय करावा.व्यवसायाचे नवीन तंत्र जोपासतानाच पारंपरिक कलेला मागणी यावी या करीता "वस्तू प्रदर्शन व विक्री" मेळावे घेतले पाहिजे."
"आपल्या समाजबांधवांना मदत म्हणून सामूहिक भागीदारीने व्यवसाय करावा.व्यवसायाचे नवीन तंत्र जोपासतानाच पारंपरिक कलेला मागणी यावी या करीता "वस्तू प्रदर्शन व विक्री" मेळावे घेतले पाहिजे."
"आपल्या
व्यवसायाची नोंदणी व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करावा. आर्थिक भांडवल
मिळविण्याकरिता कागदोपत्री बाजूवर विशेष तयारी करावी.शासकीय सवलतीचा लाभ समाजाला
मिळवून द्यावा."
श्री.जयवंतराव पांचाळ साहेब,परिक्षेत्र वनाधिकारी
श्री.जयवंतराव पांचाळ साहेब,परिक्षेत्र वनाधिकारी
"सुसंवाद
परिवर्तन यात्रेचे नियोजन करण्याकरिता संपूर्ण मराठवाड्यात आम्ही बाळासाहेबांच्या
सोबत परळी येथील सर्व कार्यकर्ते सोबत राहू. महाराष्ट्राच्या समाजकारणात
मराठवाड्याची विशेष छाप पडणार म्हणजे पडणारच."
श्री.सुधाकर भाऊ पांचाळ भाजप पदाधिकारी व सक्रिय सामाजिक कार्यकर्ते
श्री.सुधाकर भाऊ पांचाळ भाजप पदाधिकारी व सक्रिय सामाजिक कार्यकर्ते
"तीर्थक्षेत्र परळी येथील विश्वकर्मा मंदिरात
बहुपयोगी निवासी संकुल व सभागृहाचे उर्वरित कार्य पूर्ण करू. बाळासाहेबांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल."
श्री.विष्णुभाऊ साखरे राष्ट्रवादी तालुका पदाधिकारी व मंदिर समिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा