बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

सुताराचा खरा इतिहास-श्री. दिनेश मोरे यांच्या लेखणीतून


सुतार समाजाचा इतिहास भाग-१



पौराणीक दृष्ट्या प्रभू विश्वकर्मा (पंचमुखी विश्वकर्मा) ने लौकीक अर्थाने पाच मुलांना जन्म दिला जे स्वतःला जहांगीड ब्राम्हण समजतात. पूर्वी आम्ही सर्वात उच्च जातीचे अशी चढाओढ असायची त्या मनोवृत्तीतून हे स्वार्थी पालुपद लावून घेतलेले असावे. आता पण ती प्रवृत्ती आहे. पण सरकारी सवलत उपटताना मात्र मी खालच्या जातीचा असे सुतारा मध्येच नाही तर इतर सर्व जातीत आहे.
तर हे पाच मुलं असे
१) मनू (लोहार) २) मयाजी (सुतार) ३) शिल्पकार (पाथरवट) ४) तांबट (कासार) ५) देवज (सोनार)
वास्तव- मानसाचा मेंदू विकसीत होण्याचा काळ साधारण २७ लक्ष वर्षापूर्वीचा आहे. सर्वात जास्त शरीराच्या वजनाच्या प्रमाणात माणसाचा मेंदू विकसीत आहे म्हणून तो उन, वारा,पाऊस व नैसर्गिक आपत्ती साठी निवारा म्हणून गुहेत रहायला लागला. 
शिकारी साठी दगडी अवाजारं बनवली, त्या दगडांना आकार दिला यालाच पाषाणयुग (stone-age) म्हणतात. 
मग दगडाला आकार देणारा पाथरवट हि जातं तेव्हा होती का ? 
प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार दगडाची अवजारे , पाणी साठवायची भांडी तयार केली कोणी एका जातीने तयार करून इतरांना आजचा सारखे विकून व्यापार केला असे त्याकाळी  शक्य नव्हते. व्यापारीकरण ताम्रयुगात पण नव्हते.
पुढील भागात ताम्रयुग बद्दल म्हणजेच (तांबट-कासार)  थोडक्यात जाणून घेऊ.
चिकीत्सक बना, विवेकी बना....



यात प्रत्येकी ९६ कुळ आहेत.


चाकाचा शोध लागलेला नव्हता म्हणून मातीची भांडी पण नव्हती. माणसाने दगडातच खोलगट आकार देऊन पाणी साठवले. 

तर जातीचा उगम हा फार अलीकडचा म्हणून शिलावट हा पौराणीक कथेतला विश्वकर्मा पुत्र पुराणातच शोभून दिसतो. 


एक लक्षात घ्या प्रत्येक युगात लाखो वर्षाच अंतर आहे. मग काय पाथरवट व तांबट या दोन भावांमध्ये लाख वर्षाचं अंतर आहे ?

                       क्रमशः

दिनेश मोरे

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

सुतार स्वाभिमान : कलायात्री श्री. डॉ. सुभाषजी पवार प्रख्यात चित्रकार,ज्योतिष्य विशारद,कलासमीक्षक,लेखक

 प्रख्यात चित्रकार,लेखक,ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक अश्या अनेकविध भूमिका यशस्वीपने सांभाळत अनेक राष्ट्रीय,राज्यस्तरीय आणि इत्तर सर्वश्रेष्ठ पुरस्कारांनी गौरविलेले, विविध उपक्रमामध्ये असलेला सातत्यपूर्ण कृतिशील सहभाग असे चित्रकला विश्वातील सिद्धहस्त व्यक्तिमत्व म्हणजे  प्रा. डॉ. सुभाषजी एकनाथ पवार होय.
डॉ.सुभाषजी पवार सर एक कलासक्त आणि कल्पक कलाकार, अभ्यासू ज्योतिषी, कलासमीक्षक म्हणून सुपरिचित आहेत. 

डॉ.सुभाषजी पवार सरांना सन्मानित करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये  ५ राष्ट्रीय , ५ राज्यस्तरीय शासकीय पुरस्कार,इत्तर ६ पारितोषिक, आंतरराष्ट्रीय टपाल तिकीट स्पर्धेसाठी सहभाग घेऊन एकमेव एकमेव पारितोषिकासाठी निवड,  १२ कलाप्रदर्शन अशी भली मोठी कला संपदा श्री. पवार सरांच्या नावावर आहेत.

आधीच्या तीन पिढीयांचा गरिबीचा वारसा असणाऱ्या कष्टकरी भूमिहीन सुतार कारागिरांच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ.सुभाषजी पवार यांनी बालपणापासूनच आत्यंतिक गरिबी व संघर्षातून जीवन शिक्षणाचे धडे घेतले. साधी चौथी देखील शिकू न शकत नसलेल्या परिस्थितीतुन त्यांनी पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण घेत आपले ध्येय साकार केले.

सुतार समाजाला भूषणावह असणाऱ्या अश्या व्यक्तिमत्वाला सुतार युवा क्रांतीचा मनाचा ग्रँड सॅल्यूट !

"टिकेला दाद न देता सुतारकाम करण्यास सुरवात"
 
 पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या सुतारकामात सरिता विश्‍वनाथ लोहार यांनी पतीला मदत करण्यास सुरवात केली. अनुभवी सुतार लाकडाला जसा आकार देतो, अगदी त्याच तडफेने त्यांनी लाकूड आणि संसारालाही आकार दिला. अंगमेहनतीच्या जोरावर सुतार व्यवसायात त्या पारंगत बनल्या आहेत. नोकरी करायचीच नाही, व्यवसाय करायचा हे स्वप्न कोल्हापूर शहराजवळील हणमंतवाडी येथील सरिता विश्‍वनाथ लोहार यांनी प्रत्यक्षात उतरवले. पंधरा वर्षांपूर्वी सरिताचा विवाह बेकनाळ (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील सुतारकाम करणारे व्यावसायिक विश्‍वनाथ लोहार यांच्याशी झाला. विश्‍वनाथ यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झालेले, तर सरिता बी. कॉम. पदवीधर. असे असतानाही सरिता यांनी विश्‍वनाथ यांना पती म्हणून स्वीकारले. शिक्षण फारसे झाले नसले तरी पतीची सुतार कामातील हुशारी व कामाचे कौशल्य पाहून त्यांनी सुतार कामात साथ द्यायचे ठरविले. बेकनाळ हे मूळ गाव असले तरी कामाच्या निमित्ताने लोहार कुटुंबीय कोल्हापूर शहराजवळील हणमंतवाडी येथे स्थायिक झाले.
     सुतारकामात पारंगत असणाऱ्या विश्‍वनाथ यांना कोल्हापूर शहरातील एका कुटुंबाकडून बेड तयार करण्याचे काम मिळाले. बेडच्या खांबांना वाघाचा मुखवटा करायचा होता. पण विश्‍वनाथ यांना तो जमला नाही. त्यांनी तुटलेले लाकूड तसेच घरी आणले. या वेळी सरिताने सहजपणे त्यांना कलाकुसरीच्या काही टिप्स दिल्या. सरिताताईंच्या सूचनेनुसार विश्‍वनाथ यांनी वाघाचा मुखवटा बनविला. याचे सर्वांना आश्‍चर्य वाटले. याच गोष्टीने सरिताला आत्मविश्‍वास मिळाला. कोणाच्याही टीकेला दाद न देता पतीच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सुतारकाम करण्यास सुरवात केली. त्यांनी पहिल्यांदा पॉलिश काम शिकून घेतले. त्यानंतर होल कुसव, रेखकाम आदी कामात त्या पारंगत झाल्या. लाकडाला रंधा मारणे, लाकूड, प्लॉयवूड आखणीनुसार कापणे, आदी कामे सरिता आता सफाईदारपणे करतात.
     सरिताचे शिक्षण बी.कॉम झाले असले तरी नोकरी करायची नाही, हे त्यांनी आधीच ठरविले होते. सरिताने फॅशन डिझायनिंगचा कोर्सही केला. पण सुतारकामात करायचे हे नक्की नव्हते. पण एका छोट्याश्या घटनेने त्यांना सुतारकामाविषयी आवड निर्माण झाली. पुढे हेच काम त्यांच्या हौसेबरोबरच उदरनिर्वाहाचे साधन बनले. रंधा घासताना लाकडाला जसा आकार येत गेला, तसे त्यांच्या करिअरनेही आकार घेतला. अंशाच्या कोनात एकेक चौकट दारे, खिडक्‍या, टेबल, खुर्ची, सोफासेट, पलंग, टीपॉय, कपाट, कपाटाची दारे अशा प्रकारे फर्निचरचे सौंदर्य खुलत गेले. महिलेच्या जन्मजात सौंदर्य दृष्टीतून फर्निचरने लक्षवेधी आकार घेतला. या कामातून आत्मविश्‍वास वाढला. आता सरिताताई एकट्याच एखाद्या फ्लॅट, दुकानगाळ्यातील फर्निचरचे काम घेतात. सुतारकामात पतीला साथ देत असल्या तरी त्यांच्या अनुपस्थितीत साईटची जबाबदारी सरिता स्वत: सुतारकाम सांभाळतात. काम खंडीत होऊ देत नाहीत.
     सतत कार्यमग्न : सकाळी सहा वाजताच सरितांचा दिवस सुरू होतो. घरात आलेले सुतारकाम दहा वाजेपर्यंत पती करतात. दहा वाजता बाहेरच्या साइटवर काम सुरू हाते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघे जण साईटवर काम करतात. दोघेही सुतारकामात निपुण असल्याने कामगारांची गरज लागत नाही. दोघांचे सुतारकाम सफाईदार अाहे, त्यामुळे गुणवत्ता टिकून आहे. आतापर्यंत सरिताताईंनी पतीच्या सहाय्याने मोठ्या गुंतवणुकीची सुतार कामे घेतली आहेत. एखादे काम ठरविताना दोघेही संबंधित ठिकाणी एकत्र जातात. या वेळी काम ठरविताना महिला कशासाठी? असा प्रश्‍न काम देणाऱ्या व्यक्तीला पडतो. परंतु, दोघे मिळून सुतारकाम करत असल्याचे समजताच एक वेगळाच आपलेपणा समोरच्या व्यक्तीला वाटतो. हा फार मोठा आनंद असल्याचे सरिता सांगतात. मजुरी आणि खंडून अशा दोन्ही पद्धतीने सुतारकामे घेतली जातात. साहित्याच्या किंमतीच्या तीस टक्के मजुरी आकारली जाते. दोघेही सुतारकाम करत असल्याने मजुरीला पैसे द्यावे लागत नाही. याचा मोठा आर्थिक आधार लोहार कुटुंबीयांना आहे. लोहार कुटुंबीयांना श्रुती व श्रावणी या दोन मुली आणि विराज हा मुलगा आहे. मुली हायस्कूलमध्ये तर मुलगा प्राथमिक शाळेत जातो. आईवडिलांचे कष्ट पाहून मुली स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात. दैनंदिन सुतार कामाचा व्याप असूनही मुलांच्या अभ्यासाकडे सरितांचे लक्ष असते.
     सरिताचा गौरव : सरिताच्या सुतार कामाची दखल घेऊन वसुंधरा सामाजिक सेवा संस्थेने उत्कृष्ट महिला कारागीर म्हणून गौरविले आहे. इंटेरिअर डिझायनिंगला करणार सुरवात, सरिता म्हणाल्या की, शिक्षणामुळे मला अधिकारी होणे मला फार कठीण नव्हते. थोड्या जिद्दीने आणखी अभ्यास केला असता तरी मीही अधिकारी झाले असते. पण सुतारकामात फारशा महिला नाहीत. या क्षेत्रात आपण काम केले तर वेगळे काही काम केल्याचा आनंद होईल. त्याचबरोबर कष्ट व प्रामाणिकपणे काम केले की, त्याचा मिळणारा मोबदलाही शंभर टक्के प्रामाणिक असतो. याचे समाधान दीर्घकाळ लाभते. हेच समाधान माझ्या हाताची ताकद वाढवते. पतीची साथ आत्मविश्‍वासाचे बळ देते. सरिता येत्या काळात इंटेरिअर डिझायनिंगचे प्रशिक्षण घेणार आहे

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८


▬▬▬▬▬▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    श्री विश्वकर्मीय श्रमिक क्रांती संघ 
▬▬▬▬▬▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬▬▬▬▬▬  विभागीय कारागीर मेळावा-२०१८💢

मराठवाडा-विदर्भ विभाग कारागीर मेळावा, औरंगाबाद :

समाजप्रेमी बांधवानो, सस्नेह जय श्री प्रभू विश्वकर्मा ! सर्व प्रथम आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..स्वातंत्र्याच्या या पर्वात महाराष्ट्र राज्यातील श्री विश्वकर्मीय समाज चळवळीस समाजहिताच्या न्याय-हक्क,मागण्यासाठी संविधानिक पद्धतीने दिशादर्शक कार्यशील करण्यासाठी समाजातील बहुसंख्य घटक असलेल्या श्रमिक, कारागीर वर्गांच्या समाजहिताचे कार्यध्येय ठेवून "श्री विश्वकर्मा श्रमिक संघाच्या-दुसऱ्या कारागीर मेळाव्याचे आयोजन मराठवाडा विदर्भाच्या केंद्रस्थानी औरंगाबाद येथे घेण्याचा संकल्प आज आपण सर्वांच्या साक्षीने करीत आहोत. उपक्रमाची तारीख स्थान निश्चित केल्यानंतर जाहीर करण्यात येईल.

संकल्पना उपक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे ठरविण्यात येईल :

संकल्पना : श्री विश्वकर्मीय समाजातील बहुसंख्य असलेल्या श्रमिक,कारागीर वर्गाना एकत्र करून "श्रमिक चळवळ" उभी करण्याची स्पष्ट संकल्पना या मेळाव्यामधून साकार होणार आहे. श्री विश्वकर्मीय श्रमिक कारागीर वर्गाला कौशल्यवान कारागीर हा स्वतंत्र दर्जा मेळावा त्यांच्या समाजकल्याण व्यावसायिक विकासासाठी शासनाने धोरण ठरवावे या विषयावर या मेळाव्यातून विचार मंथन भविष्यकाळातील कार्यदिशा यावर सविस्तर विचार मंथन करण्यात येईल

तसेच सध्याच्या विविध शासकीय योजना, कामगार नोंदणी, खादि ग्रामउद्योग आयोग,प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महामंडळ मुद्रा या स्वरूपाच्या भांडवल पुरवठा करणाऱ्या योजनांची माहिती त्या त्या क्षेत्रातील मान्यवर,अभ्यासक अधिकारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतून समाज बांधवाना देण्याची संकल्पना या मेळाव्यातून साकारणार आहेतसेच समाजबांधवांच्या प्रोत्सहन करीता हस्तकला प्रदर्शनाचे आयोजनासह व्यावसायिक प्रगती साठी अत्याधुनिक मशनरीज, विविध साहित्य यांचे प्रदर्शन हि आयोजित करण्यात येईल.

संयोजन : सदरील मेळाव्याचे संयोजन मराठवाडा विदर्भ विभागातील जेष्ठ समाजप्रेमी मार्गदर्शक,सक्रिय कार्यसेवक समाजबांधव यांच्या सहकार्याने श्री विश्वकर्मा श्रमिक संघ या कामगार संघातर्फे करण्यात येईल. या मेळाव्याचे नेतृत्व हे समाजातील कार्यकर्ते म्हणून सर्व बांधव करतील. या साठी कोणतेही व्यक्तिगत पद,प्रतिष्ठा किंवा संघटनावाद पुढे येणार नाही.

 सहभाग : या उपक्रमामध्ये समाजातील श्रमिक, कारागीर वर्ग त्या त्या भागातील सामाजिक संस्था यांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच समाजातील सक्रिय समाजप्रेमी कार्यकर्ते समाजबांधव यांना आमंत्रित केले जाईल.

व्यासपीठ विषय : सदरील उपक्रम हा केवळ समाजातील श्रमिक, कारागीर वर्गाना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी असल्याकारणाने केवळ त्यांच्या हिताच्या संबंधितच चर्चा या व्यासपीठावरून करण्यात येईल. त्यासाठी कामगार व्यावसायिक क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक, शासकीय अधिकारी शासनाचे प्रतिनिधी यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येईल.

प्रेषक आर्थिक मदत : सदरील उपक्रमाचे प्रेषक प्रसिद्धी "श्री विश्वकर्मा समाज, मराठवाडा विदर्भ विभाग" असणार आहे. या उपक्रमाचे श्रेय हे समाजालाच असणार. उपक्रमाकरिता आवश्यक आर्थिक मदत व्यावसायिक डिरेक्टरी हस्तकला प्रदर्शनातून जमा करण्यात येईल. या उपक्रमाला व्यावसाईक साहित्य पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्या व्यावसायिक यांचेकडून प्रयोजकीय शुल्क आकारण्यात येईल. त्या सोबतच समाजातील सक्षम समाजप्रेमी बांधवांकडून देणगी स्वरूपात आलेल्या निधीचा उपयोग करण्यात येईल.

आर्थिक व्यवहार खर्च यासाठी कारागीर प्रतिनिधींची तात्पुरती समिती समिती स्थापन करण्यात येईल कार्यक्रमाचा जमाखर्च जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित फक्त देणगीदारांना देण्यात येईल.

समाजप्रेमी बांधवानो, मागील वर्षीचा कामगार मेळावा मा. कामगार मंत्री श्री.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली अगदी शिस्तबद्ध समाजाच्या प्रचंड उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.मंत्री महोदयांनी आपल्या समाजाच्या बाबतीत कौशल्यवान, प्रामाणिक असे उल्लेखून प्रभू विश्वकर्मा यांची महिमा यावर भाष्य केले. समाजाच्या न्याय-हक्क मागण्यासाठी शासनाला समयोचित विषयासह शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक असते.

हस्तकला कारागीर वर्गासाठी शासनाने राखीव ठेवलेला निधीचा " श्री विश्वकर्मा हस्तकला कौशल्यविकास बोर्ड" या माध्यमातून श्री विश्वकर्मीय कारागीर बांधवाना घेता यावा त्यासाठीचा पाठपुरावा या साठी कार्यदिशा मिळावी या करीता आपण सर्व समाजबांधवांच्या पाठबळावर या मेळाव्याचा धाडसी संकल्प केलेला आहे.

या उपक्रमाला विविध माध्यमातून जास्तीत जास्त समाज बांधव जोडावेत. उपक्रमाची संकल्पना रुपरेषेमध्ये काही त्रुटी, नवीन सूचना आवश्यक असल्यास सुधारणा करण्यात येतील.

या उपक्रमाकरिता समाज बांधवांचा संपर्क व्हावा प्रचार प्रसार व्हावा या करीत ऑन-लाईन संपर्क जोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी.

📧 नोंदणी https://goo.gl/forms/ahU9b8s4bdVhzIYt1 📧 -मेलsutaryuvakranti@gmail.com📲व्हाट्सअँप- ९५२७७८००९९

आपलाच,सैदवसमाजऋणात,

श्री.बाळासाहेब पांचाळ, नांदेड
संदेशप्रसारक
▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
हा उपक्रम समाजाचा असल्याकारणाने कोणतीही व्यक्तिगत ©® नाही. ज्या बांधवाना हा मेळावा समाजहिताचा वाटतो त्यांनी स्वतःच्या नावे प्रसिद्ध करावा.हि माहिती सर्व ग्रुप समाज बांधवा पर्यंत पोहचवा समाज कार्यास सहकार्यकरावे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬