शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

विश्वकर्मीय समाज परिवर्तन सुसंवादयात्रा,०१ जानेवारी,२०१९ श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर,श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ, बीड

             
         

                        


              ०१ जानेवारी २०१९ : श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर : दुपारी ४ वाजता 

              श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ, बीड

सस्नेह जय श्री प्रभु विश्वकर्मा ! समाजबांधवांनो..आपण सर्वानी समाजसंपर्क नोंदणीस दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबदल हार्दिक आभार !


समाज नोंदणीद्वारे  समाजातील कारागीर,कष्टकरी श्रमिक,जेष्ठ युवासुशिक्षित,कर्मचारीकला-क्रीडा व विविध  क्षेत्रातील सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिक्रियासमाजमत प्राप्त झाले. 


नोंदणी माध्यमातून समाजाने व्यक्त केलेल्या अपेक्षेतूनच समाजाच्या मार्गदर्शनाखाली समाजचळवळीस साक्षेप करण्यासाठी गावोगावी विखुरलेल्या आपल्या माणसांशी सरळ सुसंवाद साधून समाजचळवळीस सक्रिय करण्यासाठी सुसंवाद परिवर्तन यात्रेची संकल्पना प्रत्यक्ष साकारीत आहोत.


तसे पाहता समाज संकल्पनेखाली पिढीजात एकत्र असलेला व परंपरागत नाते संबंधातून समन्वय साधणारा समाज जेंव्हा संघटित होतो तेंव्हाच खऱ्या अर्थाने  सामाजिक,राजकीयसामाजिक व आर्थिक प्रगतीचे ध्येय गाठता येते.

होय, आपण निर्धार केला आहे..नवीन वर्षाचा पहिला दिवस हा विश्वकर्मीय सामाजिक सुसंवाद दिन व्हावा याकरिताच दि.०१ जानेवारी,२०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग असणाऱ्या मराठवाड्यातील पावन भूमीत श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे आपल्या 

सर्वांच्या सहकार्याने व साक्षीने विश्वकर्मीय समाज परिवर्तन सुसंवादयात्रा प्रारंभ करूया !


पहिल्या टप्प्यात मार्चपर्यंत संपूर्ण मराठवाड्यातील २७ ठिकाणी विश्वकर्मीय समाज परिवर्तन सुसंवादयात्रा माध्यमातून प्रत्यक्ष समाजाशी समाजरूप होण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.


                                   प्रमुख उपस्थित मार्गदर्शक 

                                  
* श्री.विष्णुपंत पांचाळ,अंबेजोगाई                   * श्री वैजनाथरावजी पांचाळ,रायवाडीकर  
    जेष्ठ सामाजिक मार्गदर्शक,बीड जिल्हा                   जेष्ठ सामाजिक मार्गदर्शक,नांदेड जिल्हा
* एड. श्री नवनाथरावजी पांचाळ                     * श्री.नंदकुमार पांचाळ,अंबेजोगाई 
    संचालक कृउबा समिती,धारूर, अभियोक्ता संघ      पत्रकार व वृत्तवाहिनी प्रतिनिधी
* प्रा.डॉ. घ.ना.पांचाळ सर,पालम                    * श्री.जयवंतरावजी पांचाळ,बाचोटीकर  
    विशेष शैक्षणिक मार्गदर्शक                                वनाधिकारी,नांदेड परिक्षेत्र
 * श्री.विष्णू भीमराव पांचाळ,कळंब               * श्री.अशोकरावजी पांचाळ,माजलगाव 
     सामाजिक कार्यकर्ते,उस्मानाबाद                        सामाजिक मार्गदर्शक,बीड जिल्हा
 * श्री.अशोकरावजी गायकवाड,गेवराई           * श्री.दिनेशजी डोरले,केज

     जेष्ठ सामाजिक मार्गदर्शक,बीड जिल्हा                 सक्रिय युवा नेतृत्व बीड जिल्हा

                               सुसंवाद यात्रा संयोजक 

                            श्री विश्वकर्मा श्रमिक क्रांती संघ
* श्री माधवभाऊ पांचाळ,लोहेकर        * श्री नारायणभाऊ पांचाळ,दिग्रसकर 
    विभागीय अध्यक्ष                               विभागीय सचिव
* श्री. भारतजी पांचाळ,लातूर              * श्री.दिगंबरराव पांचाळ,परभणीकर
    विभागीय उपाध्यक्ष                            विभागीय सहसचिव
* श्री. रामभाऊ रत्नपारखी,लातूर         श्री.मंगेशभाऊ पांचाळ,फुलवळकर
   विभागीय उपाध्यक्ष                              विभागीय कोषाध्यक्ष

                                            कार्यक्रमाचे संयोजक 

मंदिर व कारागीर समिती,परळी वैद्यनाथ

समस्त श्री विश्वकर्मीय समाज,परळी वैद्यनाथ

श्री विश्वकर्मा युवा क्रांती मित्र मंडळ,परळी वैद्यनाथ


कार्यक्रमाच्या सत्रात कारागीर बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनेचे संपूर्ण मार्गदर्शन प्रोजेक्टर द्वारे करण्यात येईल.


गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

श्री विश्वकर्मीय समाजातील सुतार,लोहार कारागिरांसाठी शासकीय योजना



श्री विश्वकर्मीय समाजातील सुतार,लोहार व इमारत बांधकाम क्षेत्रातील कामगार बांधवानी कामगार नोंदणी करून शासनाच्या आरोग्य,शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक योजनेचा लाभ घ्यावा.
===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+===+====


जय श्री प्रभु विश्वकर्मा ! समाज बांधवानो श्री विश्वकर्मीय समाजातील प्रमुख घटक सुतारकाम,लोहारकाम करणारा पारंपरिक ग्रामीण तसेच शहरी श्रमजीवी वर्गच आहे. समाजातील बहुसंख्य असलेल्या श्रमजीवी कारागीर बांधवाना समाजकार्याचे केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्या विविध योजनांचे लाभ समाजापर्यंत कोणतेही आर्थिक शोषण न होता पोहोचावेत या साठी श्री विश्वकर्मीय श्रमिक क्रांती संघ या श्रमिक संघटनेमार्फत प्रयत्न केले जातात.

श्री विश्वकर्मीय श्रमिक क्रांती संघातर्फे कामगार नोंदणीसाठी विशेष अभियान  :


कामगार नोंदणीच्या माध्यमातून श्री विश्वकर्मीय समाज बांधवाना शासकीय योजनेचा सरळ व पारदर्शीपणे लाभ घेता यावा या करिता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका स्तरावर सामूहिक कामगार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. सदरील कामगार नोंदणी हि स्थानिक जिल्ह्यातील कामगार अधिकारी यांचे कार्यालयात होणार आहे. 

कामगार नोंदणीमध्ये श्री विश्वकर्मीय समाजाचा सहभाग वाढावा या करिता स्थानिक पातळीवरील सक्रिय सामाजिक संस्था तसेच समाज सेवकांचे सहकार्य घेण्यात येईल.कामगार नोंदणीसह नोंदणीकृत समाजबांधवांना योजनेतील विविध लाभ मिळावेत यासाठी वेळोवेळी तालुका प्रतिनिधी मार्फत प्रत्यक्ष आवश्यक ती मदत व शासकीय 
पाठपुरावा करण्यात येईल.

या साठी श्री विश्वकर्मीय श्रमिक संघास भारतीय मजदूर संघाची संलग्नता प्राप्त आहे. बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेसाठी "महाराष्ट्र बांधकाम कामगार महासंघ" व "अनुलोम (अनुगामी लोकराज्य महाभियान )" यांचे प्रतिनिधी आणि थेट मंडळाच्या बोर्डवरील शासनाचे नियुक्त सदस्य व अधिकारी यांचे सहकार्य लाभणार आहे.

श्री विश्वकर्मीय कारागीर बांधवाना असंघटित कामगार योजनेचे लाभ : 

प्रामुख्याने ग्रामीण भागातील सुतार,लोहार कारागीर चौकटी,दरवाजे, घरातील फर्निचर साहित्य,लोखंडी ग्रील,स्टील रेलिंग बनवितो.या प्रमाणेच प्रत्येक इमारतीत लाकडी,प्लायवुड-सनमायिक,स्टील,   लोखंडी,अल्युमिनियम,काच तावदाने या प्रमाणे काम करणाऱ्या कामगार बांधवांची नोंदणी "महाराष्ट्र इमारत व इत्तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ" या कामगार मंत्रालयाच्या स्वतंत्र मंडळाकडे होऊ शकते.

नोंदणीकृत कामगारासांठी कल्याणकारी योजना :




21 प्रकारचे कामे करणारे कामगार

  • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.
  • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.
  • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.
  • गटार व नळजोडणीची कामे.
  • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.
  • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
  • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
  • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.
  • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.
  • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.
  • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.
  • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.
  • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.
  • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.
  • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.
  • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.
  • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.
  • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.
  • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.
  • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.
  • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
नोंदणी पात्रता निकषनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
  • १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  • इमारत व इत्तर बांधकामाकरिता आवश्यक कोणत्याही प्रकारचे काम करणारा स्त्री किंवा पुरुष कामगार
  • मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
  • मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  • नोंदणी फी :- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/-
  • वयाचा पुरावा
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
कामगार नोंदणीचा अर्ज :
कामगार नोंदणीचा अर्ज प्रत्येक कामगार अधिकारी कार्यालयात निशुल्क मिळतो. सामूहिक नोंदणीसाठी तालुका-जिल्हास्तरावर कामगार नोंदणी अभियान राबविण्यात येईल.

बांधकाम क्षेत्रात एकूण वर्षभरात ९० दिवसापेक्षा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र : 

कामगार नोंदणीच्या अर्जासह बांधकाम क्षेत्रात एकूण वर्षभरात ९० दिवसापेक्षा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. सदरील प्रमाणपत्र हे कामगार अधिकारी यांचेकडे नोंदणी केलेले आस्थापना जसे बिल्डर,कॉन्ट्रॅक्टर यांचेकडून घ्यावे. ज्या बांधकामावर ५० पेक्षा अधिक कामगार काम करतात त्यांना कामगार अधिकारी यांचेकडे नियोक्ता म्हणून नोंदणी करणे अनिर्वाय आहे.

शहरी भागात स्वतंत्र काम करणाऱ्या कामगारांकरिता शासनाने नगरपरिषद व पंचायत समिती व ग्रामविकास अधिकारी यांना प्राधिकृत केलेले आहे.

ग्रामीण भागातील कामगारांसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र :

ग्रामीण भागातील कामगारांसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक यांचेकडे कामगार म्हणून नोंद करून घेऊन त्यांचे प्रमाणपत्र मंडळाचे जिल्हा कामगार अधिकारी यांच्या अर्जासोबत जोडावे.

शहरी भागाकरिता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किंवा अभियंता-उपअभियंता यांचे प्रमाणपत्र जोडावे.


ग्रामसेवक, अभियंता-उपअभियंता यांचेकडे खालील नमुन्यातील अर्जासह रहिवाशी व ओळखपत्र म्हणून आधारकार्ड व जोडावे. अर्जावर पासपोर्ट फोटो जोडून जावक क्रमांकासह सही व शिक्का असणे आवश्यक आहे. त्या करीत हा अर्ज दोन प्रतीत भरावा.

: ग्रामीण भागाकरिताचे प्रमाणपत्र :
: शहरी भागाकरिताचे प्रमाणपत्र :


योजनेच्या लाभाचे विविध अर्ज :





`