मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

विदर्भवाशीयांचे श्री विश्वकर्मा पुजन दिन-१७ सप्टेंबर २०१८

🛑  विदर्भवाशीयांचे श्री विश्वकर्मा पुजन दिन-१७ सप्टेंबर २०१८ 🛑 

वरवट बकाल,बुलढाणा : समाजप्रेमी बांधवानी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात श्री विश्वकर्मा पुजन दिनाचे आयोजन करण्यात आले. श्री विश्वकर्मा पुजन दिनाचे औचित्य साधून विदर्भातील वटवट बकाल येथे भव्य स्वरूपात बांधण्यात आलेल्या श्री विश्वकर्मा मंदिर व सभागृहाचे लोकार्पण सोहळा व जेष्ठ,गुणवंत,कारागीर बांधवांचा सत्कार समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख समाजप्रेमी कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

✨ कर्यक्रमाचे सुरुवात श्री विश्वकर्मा प्रभूच्या पूजाने झाली. श्री.सुदाम अण्णा खैरनार व हभप दहीकर महाराजांच्या हस्ते श्री विश्वकर्मा पूजन झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रसिद्ध गायक व विवेकानंद आश्रम हिवरा येथील प्रा. मसूदकर व राऊत सरांच्या सुरेल गीताने झाले.
✨ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रदेशाध्यक्ष श्री.सुदाम अण्णा खैरनार यांनी समाजाला सामाजिक आरक्षणाचे महत्व व त्यासाठीचे चालू असलेले प्रयत्न व पुढील संघर्षासाठी समाजाला साद घातली. अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघामार्फत विविध ठिकाणी मागण्याचे निवेदने देण्याची महत्वपूर्ण सूचनाहि केली.
✨ उपस्थित समाजातील कारागीर बांधवाना विविध शासकीय सोयी सवलतीचा लाभ घेण्याकरिता असंघटित कामगार म्हणून नोंदणी करण्याकरीता समाजातील कामगार नेते श्री. सतीशजी शिंदे, अध्यक्ष सुतार विकास मंच यांनी मार्गदर्शन व आवाहन केले. 

✨ व्यासपीठावर प्रमुख आमंत्रितांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण हभप श्री. दहेकर महाराज ,बुलढाण्याचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापरावजी जाधव, समाजप्रियआमदार श्री. संजयजी रायमुलकर आ. श्री. संजयजी कुटे,जेष्ठ अभ्यासू समाज नेतृत्व प्रदेशाशाध्यक्ष श्री. सुदाम अण्णा खैरनार,जि.प.अध्यक्ष श्री प्रकाश पाटील,पणन महासंघाचे श्री.प्रसेनजीत पाटील व विदर्भातील सामाजिक चळवळीचे प्रेरणास्रोत प्रा.श्री.विजयजी रायमलकर सर,समाजाचे कामगार नेते श्री.सतीशजी शिंदे,अध्यक्ष सुतार विकास मंच तसेच सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थतीत होते.

✨सुतार समाजातील विविध सामाजिक विषयाला प्रत्यक्ष साक्ष देणाऱ्या या भव्य उपक्रमाचे वैशिष्ट्य :
⭕ आमदार,खासदार निधीमधून पूर्णत्वास आलेल्या भव्य श्री.विश्वकर्मा मंदिर व सभागृहाचे लोकार्पण सोहळा
⭕ सुतार समाजातील शैक्षिणक गुणवंत, व कुशल कारागिरांचा व जेष्ठांचा सत्कार समारंभ
⭕ समाज नेतृत्व श्री सुदाम अण्णा खैरनार यांनी समाजाची आरक्षण विषयक भूमिका व संघर्षांसाठीची साद 
⭕ सुतार समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना आर्थिक मदत
⭕ प्रभु श्री विश्वकर्म पुजन व हभप श्री दहेकर महाराजांचे सामाजिक प्रबोधन व मान्यवरांचे मार्गदर्शन   


✨ आगामी काळात महाराष्ट्रातील सुतार समाजाच्या न्याय-हक्कासाठी संपूर्ण राज्यभरात सक्रिय करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची सुरुवात म्हणून "श्री विश्वकर्मीय सुतार संघर्ष महासमिती" च्या प्रत्यक्ष सामाजिक व कायदेशीरअभ्यासातून मांडण्यात आलेल्या न्यायोचित मागण्याचे निवेदन एड.श्री बाळासाहेब पांचाळ यांनी सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आले.
 ✨ तसेच नियोजित "मराठवाडा व विदर्भीय श्रमिक कारागीर मेळावा-२०१८" ची घोषणा करण्यात आली. सुतार समाजाच्या मागण्यावर शासनाने सकारात्मक व लवकर निकाली काढाव्यात या साठी स्वतः खासदार साहेब, व आमदार साहेबानी मा.मुख्यमंत्री भेटीसाठी समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचे अभिवचन व्यासपीठावरून समाजबांधवांना दिले.

विदर्भातील सर्वात भव्य व समाजहितेशी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील सर्व समाजप्रेमी कार्यकर्ते व संस्थांनी पुढाकार घेतला. यातूनच विदर्भातील संघटित सुतार समाजाची ओळख निर्माण झाली आहे. भव्य व्यासपीठ, उपस्थित समाजबांधवांची खासी व्यवस्था व स्वादिष्ट महाप्रसाद आणि अहोरात्र झटणारे निस्वार्थ,निरपेक्ष पण सक्षम सामाजिक कार्यकर्ते याचे साक्ष स्वरूप म्हणजेच विदर्भवाशीयांचे श्री विश्वकर्मा पुजन दिन-१७ सप्टेंबर २०१८

🛑 कार्यक्रमाचे निवडक क्षणचित्रे : 🛑








शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

सुतारांचा खरा इतिहास- पांचाळ,विश्वब्राह्मण या पौराणिक मिथकाच्या मिंदेपणाची लक्तरे टांगणारे संदर्भीय अभ्यासपूर्ण लिखाण-श्री दिनेश मोरे



सुतार समाजाचा इतिहास

🛑 सुतार समाजाचा इतिहास : भाग-

पौराणीक दृष्ट्या प्रभू विश्वकर्मा (पंचमुखी विश्वकर्मा) ने लौकीक अर्थाने पाच मुलांना जन्म दिला जे स्वतःला जहांगीड ब्राम्हण समजतात. पूर्वी आम्ही सर्वात उच्च जातीचे अशी चढाओढ असायची त्या मनोवृत्तीतून हे स्वार्थी पालुपद लावून घेतलेले असावे. आता पण ती प्रवृत्ती आहे. पण सरकारी सवलत उपटताना मात्र मी खालच्या जातीचा असे सुतारा मध्येच नाही तर इतर सर्व जातीत आहे.

तर हे पाच मुलं असे :

) मनू (लोहार) ) मयाजी (सुतार) ) शिल्पकार (पाथरवट) ) तांबट (कासार) ) देवज (सोनार)
वास्तव- मानसाचा मेंदू विकसीत होण्याचा काळ साधारण २७ लक्ष वर्षापूर्वीचा आहे. सर्वात जास्त शरीराच्या वजनाच्या प्रमाणात माणसाचा मेंदू विकसीत आहे म्हणून तो उन, वारा,पाऊस नैसर्गिक आपत्ती साठी निवारा म्हणून गुहेत रहायला लागला.

शिकारी साठी दगडी अवाजारं बनवली, त्या दगडांना आकार दिला यालाच पाषाणयुग (stone-age) म्हणतातमग दगडाला आकार देणारा पाथरवट हि जातं तेव्हा होती का

प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार दगडाची अवजारे , पाणी साठवायची भांडी तयार केली कोणी एका जातीने तयार करून इतरांना आजचा सारखे विकून व्यापार केला असे त्याकाळी  शक्य नव्हते. व्यापारीकरण ताम्रयुगात पण नव्हते.

पुढील भागात ताम्रयुग बद्दल म्हणजेच (तांबट-कासारथोडक्यात जाणून घेऊ.

चिकीत्सक बना, विवेकी बना....

यात प्रत्येकी ९६ कुळ आहेत.

चाकाचा शोध लागलेला नव्हता म्हणून मातीची भांडी पण नव्हती. माणसाने दगडातच खोलगट आकार देऊन पाणी साठवले

तर जातीचा उगम हा फार अलीकडचा म्हणून शिलावट हा पौराणीक कथेतला विश्वकर्मा पुत्र पुराणातच शोभून दिसतो

एक लक्षात घ्या प्रत्येक युगात लाखो वर्षाच अंतर आहे. मग काय पाथरवट तांबट या दोन भावांमध्ये लाख वर्षाचं अंतर आहे ?


🛑 सुतार समाजाचा इतिहास :भाग-     

ताम्रयुग 

तांबट- (कासार) देवज - (सोनार),मनु(लोहार), मयाजी(सुतार)

पांचाळ म्हणजेच भाग मध्ये उल्लेख केलेल्या पौराणिक मिथकातील विश्वकर्माची संतान, त्यात नमूद केलेले पाच भाऊ. याचाच तार्कीक अर्थाने धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
पाथरवट हा पाषाण युगातच जन्मला त्याने दगडी अवजारं बनवले हे मागील भागात (भाग-) पाहिले.
या भागात (भाग-) तांबट (कासार), देवज(सोनार) मयाजी (सुतार),मनु (लोहार) बद्दल जाणून घेऊ.

ताम्रयुग

या युगाचा प्रारंभ अंदाजे ख्रिस्त पूर्व ३००० ते २००० मानला जातो. याच काळात चाकाचा शोध लागला मानसाच्या मेंदूला चालना गती मिळाली.  जगातील सर्वात प्राचीन संस्कृती ग्रीस मेसोपोटेमीया येथे मातीची भांडी बनवणाऱ्या चाकाचे अस्तीत्व आढळ्ले. (.. पूर्व ३५००) इजिप्त मध्ये .. पूर्व २००० चाकाचे रथ वापरले गेलेत. ते बनवणारे अर्थातच आपले पूर्वज होते. लाकडी आरवा आस भोवती फिरण्याला गोलाकार गतीला जन्म देणारा सुतार (मयाजी)प्राचीन भारतात युध्दात रथ वापरले जातं. या रथकाराला ऋगवेदात ऋभू असं म्हटलय.

भारतीय संस्कृती कोशात चाकाचे भाग पत्री(धातूची धाव), प्रधी (घेर),वर्तुळ(मुख्य चाक),अर(आरे), नभ्य (तुंबा) अक्ष (आस) अशी नावं सापडतात. सुताराने लाकडी काम केल्यावर लोखंडाची धावं लोहार चढवायचा.

सर्वात आधी तांबे या धातूचा शोध लागला. अन मातीची भांडी चाकावर बनवणाऱ्या मानसाने तांब्यांची भांडी बनवायला सुरुवात केली इथे तांबट (कासार) चा जन्म झाला.

कथील तांबे या दोन धातुंचे मिश्रण करून मानसाने कथिल हा धातू बनवला. तांबे धातूचा शोध आधी लागल्यामुळेच मानसाने चलनवलन साठी नाणी तांब्याचीच बनवली.

लोहयुग
लोह युगाची सुरुवात म्हणजे लोखंड हा धातू शोधायचा काळ .सं.पूर्व १८०० ते १२०० आहे.

मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे वेद मानवाने निर्माण केलेत त्यात लोखंडी लोह या धातूचे काम करणाऱ्या लोहाराला कर्मार हि सज्ञा दिली आहे.
म्हणजेच लोहारचा (मनुचा) जन्म हा १८००-१२०० .. पूर्व असा आहे.

फार उशीराने सोने चांदी या मूल्यवान धातूचा शोध लागला हा काळ अंदाजे ..पूर्व १००० ते ३०० असावा असे काहींचे म्हणणे आहे. पण इतर धातूंपेक्षा प्राचीन भारतभूमीत याचे फार अत्यल्प प्रमाण आहे.आणी या धातूवर काम करणाऱ्या देवज (सोनार) त्यामानाने फार उशीरा जन्माला आला

अशा रीतीने वेगवेगळ्या कालखंडात मानवी मेंदूच्या प्रगतीनुरुप वेगवेगळ्या कारागीरांचा जन्म झाला. कारागीरीचे काम करनारे या अर्थाने ते विश्वकर्मा चे वारस ठरतात, म्हणून पौराणीक मिथकाप्रमाणे ते भाऊ नव्हेत. जसे कि शिवरायांचे सध्याचे रक्ताचे वशंज जरी बेताल बोलणारे, दारूडे असले. भिडे गुरुजी या ठगाचे प्रशंसक असले, तरी आम्ही खरे शिवरायांच्या विचारांचे वारस आहोत अगदी तसेच.
म्हणून पुराणातली वांगी पुराणातच शोभून दिसतात. ताकीर्क अर्थाने ते घेऊ नये.

पुढील भागात चार्तुवण्य व्यवस्थेतून जातीची निर्मिती पांचाळ सुतार म्हणजे नेमकं काय हे पाहू

संदर्भ - भारतीय संस्कृती कोश खंड -८वा
क्रमशः

🛑 सुतार समाजाचा इतिहास भाग -

चार्तृर्वण्य व्यवस्थेतून जातीची निर्मिती
विषय तसा खूप मोठा आहे पण आपल्याला आवश्यक तेवढ्या बाबीचा उहापोह करु.

आतापर्यंत आपण नैसर्गिक साधन संपत्तीची जशी जशी माहिती मनुष्य या तल्लख बुध्दीच्या प्राणीला होत गेली तसतशी त्यावर प्रक्रिया करण्याची कला (कारागीरी) त्याने हस्तगत केली. पण हि नैसर्गिक संपंत्ती जेवढी सहज आणी मुबलक उपलब्ध तेवढे त्यावर कारागीरी , कलाकुसर करणाऱ्या कारागीरचे महत्व कमीअधीक होत गेले. उदाहरनार्थ- दगड हे गौण खनिज जास्त प्रमाणात उपलब्ध म्हणून त्यावर कलाकुसर करणाऱ्या पाथरवट ची किंमत कमी. तसेच लाकूड, लोखंड, तांबे, सोने- चांदी इत्यादी वर काम करणाऱ्या कारागीरांचे महत्व वाढत जाते त्या त्या कालखंडात हे करागीर कसे निर्माण होत गेलेत हे पाहिले.

..पूर्व १५००-५०० या कालावधीत वर्णव्यवस्थेचे अस्तित्व मानले जाते.हाच वेदांचा निर्माण काळ.
ऋगवेदात फक्त दोनच वर्ण होते. आर्यवर्ण दासवर्ण. नंतर वेदांचा अधिकार असणाऱ्यानी त्यात स्वार्थासाठी आपले स्थान उच्च ठेवण्यासाठी पुरुषसुक्त घुसवले ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य शुद्र अशा चार वर्णाची निर्मिती वैदीकांनी म्हणजेच ब्राम्हणांनी केली.
ऋग्वेद काळात समाज हा व्यवसायानुसार वर्गीकरण केलेला नव्हता. अनेक शेतकरी,कारागीर वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणारे होते. त्याकाळात युध्दात रथाचे महत्व होते म्हणून रथकार (रथ बनवणारे) कर्मार(धातू काम करणारे) यांना खूप महत्व होते. आणी म्हणून कदाचित त्याच गैरसमजातून आज देखिल सुतार -लोहार समाजातील काहीजण (झापड बसवलेले) स्वतःला विश्वब्राम्हण, ब्राम्हण, ब्राम्हणाहून श्रेष्ठ समजतात. पण कालांतराने वेद जाणण्याचा,वाचण्याचा हक्क असणाऱ्या वैदीकांनी या समूहाला कारागीरांना शुद्र वर्णात लोटले हे कुठे यांना कळतं ? मनूने मनूस्मृती लिहून उच्चवर्णियाचे हितसंबध जोपासणारी नियमावली बनवून त्यावर कळस चढवला. वैदीकांनी क्षत्रीय वर्ण नाहीसा केला. परशुरामने पृथ्वी निःक्षत्रिय केली असा पुराणात उल्लेख आहे. शेवटचा क्षत्रिय राजा नंद होता असे मानले जाते. आर्य चाणक्याने त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर झालेले सर्व राजे हे ब्राम्हणांच्या अधिपत्याखाली असणारे वैश्य शुद्र होते. परकीय मुस्लीम आक्रमनानंतर सुध्दा अशीच व्यवस्था या धूर्त लोकांची होती. म्हणून छत्रपति शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला गेला.
वैश्य हा व्यापार उदीम करणारा होता त्यामुळे तो जातीत विभागला गेला.
मौर्य काळात गटांची निर्मिती झाली सामंतशाही मधून .. ते १२ व्या शतकात जाती प्रत्यक्षात उदयाला आल्या.
मातीचे काम करणारा कुंभार झाला , लाकूड काम-सुतार, लोखंड- लोहार अशा जन्मावर आधारीत जात निर्माण झाली. यात क्षत्रिय, वैश्य हे दोन्ही वर्ण जात या संकल्पनेत विभागले गेलेत.
फक्त एक आणि एकच वर्ण शिल्लक आहे तो म्हणजे ब्राम्हण
म्हणून सुतार - लोहार जातीने स्वतःला ब्राम्हण या वर्णाचे समजू नये. हि झापडं डोळ्यावरून काढा. जन्मानुसार व्यवसायानुसार आपण ज्या जातीत जन्मलो तिचाच अभिमान बाळगून आपण जातीत जन्मलो म्हणून इतर मागासवर्गिय आहोत वर्ण नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी शिकून आपल्या जातीला शुद्र असून देखील प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आपल्यासारख्या इतर मागासवर्गाला पण घटनेत कलम ३४० नुसार समानतेचा हक्क दिला. .फुलेंनी , शाहूंनी वारंवार या बहुजन समाजाला इशारा दिला आहे , सावध केले आहे. या तिनही (फुले,शाहू, आंबेडकर) महामानवांचे त्यांच्या स्वतःच्या जातीव्यतिरीक्त या इतर मागास वर्गावर अनंत उपकार आहेत. ति जाणिव ठेवून आपण शिकून सघंटीत होऊ या.
पाच बांधव हे पुराणानुसार विश्वकर्माचे कारागीर या  रुढार्थाने पुत्र आहेत, तर्कशास्त्रीयदृष्ट्या त्यांचा तसा भावंड म्हणून काहीही संबंध नाही कारण प्रत्येक कालखंडात वेगवेगळी कारागीरी जन्माला आली. म्हणून पांचाळ म्हणजे हे पाच भाऊ नसून , पाचांळ सुतार म्हणजे नेमकं काय?
पुढील भागात पांचाळ सुतार अहिर सुतार म्हणजे काय. हे पाहूया
संदर्भ-) मराठी विश्वकोश. ) श्रीमद्भागवत महापुराण.

🛑 सुतार समाजाचा इतिहास भाग-

पांचाळ सुतार-
प्रभु पंचमुखी विश्वकर्माचे पाच मुलं (मयाजी, मनु, तांबट,शिलावट देवज) हे सर्व बंधु म्हणजेच पांचाळ हे पुराणातले मिथक आपण माझ्या लेखातील तिन भागात खोडून काढले पांचाळ म्हणजे हे  पाच भावंड नाहीत हे सिध्द केले.
मग पाचांळ म्हणजे नेमके कोण ? हे कुठून आलेत हे जाणून घेऊ
प्राचिन भारतात (..पूर्व ६००) सोळा महाजन पदं होती त्यापैकी एक महाजन म्हणजे पांचाळ. त्या प्रदेशातून आलेले विविध कारागीरीचे काम करणारे पांचाळ उदा. पांचाळ सुतार, पांचाळ सोनार, पांचाळ लोहार इत्यादी.
ती सोळा महाजन पद अशी-)गांधार,)कांबोज,)कुरू, )पांचाळ, )कोसल,)शुरसेन,) मत्स्य,) अवंती, )अश्मक,१०) वत्स, ११)चेदी,१२) काशी, १३)मगध, १४)दुज्जी,१५) अंग, १६)मल्ल. (प्राचिन भारताचा नकाशा दिला आहे त्या वरून कळेल).
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडाच्या प्रदेशात पांचाळ राज्य होते. यमुना नदीच्या खोऱ्यात कुरु राज्याच्या शेजारी हे राज्य होते. गंगा नदीमुळे हे राज्य उत्तर,दक्षिण दोन भागात विभागले होते. अहिच्छत्र कांपिल्यया दोन राजांच्या राजधान्या होत्या.
द्रौपदी हि पांचाळ नरेश दृपद राजाची कन्या होती. कुरू पांचाळ यांचे वैर परंतु मगध ने हे राज्य जिंकले. मगध नरेश जरासंध हा फार शक्तीशाली राजा होता त्याला घाबरून कृष्णाने मथुरा सोडून द्वारकेला प्रस्थान केले. असे महाभारत काव्यात म्हटलय. मध्ययुगिन इतिहास काळात पांचाळ राज्य हे रूहेलखंड म्हणून ओळखले जात होते.
अधुनिक रूहेल खंडात उत्तरप्रदेश (यु.पी) मधील मुरादाबाद, रामपूर,बरेली, पिलीभीत, शहाजानपूर ही शहरे येतात. त्या रूहेल खंडातून (पांचाळ) आलेले आपले सुतार बांधव हेच पांचाळ सुतार.
यावरून पांचाळ म्हणजे भौगोलीक प्रदेश पांचाळ येथुन आलेला जनसमूह. म्हणजे ते काल्पनिक पुराणातले पाच भावंड नाहीत.

अहिर सुतार-

अहिर,अभिर, या समुदायाला यादव म्हणून देखिल संबोधले जाते. मातृसत्ताक संस्कृती मानणारा समाज. कंस मामा मथुरेत देवकी च्या मातृसत्ताक राज्याचा कारभारी होता.आपली बहीण देवकिला पुत्र झाल्यावर आपलं सिंहासन जाईल म्हणून तो चिंतीत होता देवकीची प्रत्येक संतान मारत होता हि पुराणकथा आहे. मातृसत्ताक समुदाय आहे म्हणून या समुदायात लग्न जोडतांना वधु वर चे मामाचे कुळ पाहिले जाते, ते एक नसावे हा शिरस्ता आहे. लग्नाची सुपारी फोडण्यापासून तर विवाह बोहल्यावर मामाला प्राधान्य असते. गोत्र अहिरांमध्ये पाहिले जात नाही.
पौराणीक दृष्ट्या राजा यायाती त्याच्या दोन राण्या देवयानी शर्मिका. देवयानी च्या पोटी यदु तुर्वशु पुढे यदुचे वशंज यादव बऱ्याच पिढीनंतर यदुवंशी राजा आहुक चे वंशज आहिर आहेत. यात व्यवसायानुरुप आहिर सुतार,शिंपी, सोनार, लोहार  हे त्या त्या जातीत आलेत.
याच यादव वंशातील एक समुह महाराष्ट्रात आला देवगीरीचा रामकृष्ण राय यादव हा त्यापैकीच एक. त्या समूहात सर्व जातीचे आहिर होते.  चितोडगड हून देवगीरी जवळचे वेरूळ, निजामपूर, आणी मग जळगाव, धुळे, नाशीक या परसरात हे आहिर वंशाचे लोकांची वस्ती आहे.
त्यात आहिर सुतार ही जात आपली मातृसत्ताक संस्कृती जपत जिवनमान जगतोय. उपनयन संस्कार होत नाहीत म्हणून शेंडी, जानवं नाही स्वतःला विश्व ब्राम्हण पण हा समाज समजत नाही. गोपालक , यादव वंशाचा समाज, हाच आहिर समाज. धुळे येथील लळिंग किल्ल्यावर गवळी (गो-पालन करणारा ) राजा होता. याचे अवशेष लळिंग, सोनगीर येथे आज देखिल सापडतात.
अहिराणी हि अहिरांची बोली भाषा.

संदर्भ- )महाभारत सभा पर्व
) मराठी विश्वकोश,.
)राजस्थान भाग-
(Anthropological Survey of India)

पुढील भागात झाडे सुतार बद्दल जाणून घेऊ.

🛑 सुतार समाजाचा इतिहास भाग-५

⭕ झाडे अथवा मय सुतार
वैदिकांनी पौराणिक कथा रचल्या या कथांमध्ये इथला भूमीपुत्र, मुलनिवासीला दैत्य,असूर किंवा दानव हे नाव दिलं आणी त्यांच्या प्रतिकांना देव. आज देखिल अक्राळ विक्राळ रूप व विकट हास्य करणारा दैत्य, असूर टि.व्ही .सिरीयल्स मधून दाखवला जातो.
वास्तवीक अ-सूर म्हणजे दारु न पिणारा (सुरा= दारु), राक्षस= रक्षण करणारा. या ऊलट यज्ञ यागात पशुबळी देणारा देव, ऋषी मुनी आणी म्हणून या अशा यज्ञ संस्कृतीला विरोध करणारा हा दानव समाज अतिशय नेक होता. पण आपल्यालाच आपल्या या आदर्श प्रतिकांविरूध्द मनात बिंबवल व त्याविरोधी बोलायला शिकवणारा धूर्त वैदीक समाज आज पण त्यात सफल होताना दिसतो.
या दानवांपैकीच एक 'मय'  (मयासुर)
मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. महाभारतातील पांडवांचा चमत्कारीक महाल (मय सभा) बांधणारा हाच मयासुर.
स्थापत्य शास्त्रात निष्णात असलेल्या या मय च्या वंशजांना लाकूड कामावर कलाकुसर, लोह काम छान जमत होते.
मय स्थापत्याचा २५०० वर्षापूर्वी मध्य अमेरिकेतील सा-या देशात मय संस्कृतीचा प्रभाव होता.
 या सभ्यतेला इतिहासकारांनी ‘ओल्मेक’ असे नाव दिले होते. या परिसरात २० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पिरॅमिड आकाराची हजारो मंदिरे आहेत. चिचेन इत्सा ही १२०० वर्शापूर्वीची मयनगरी होती.योद्ध्यांच्या मंदिरासाठी ते प्रसिद्ध होते.यावर कमळ आणि स्वस्तिके यांची शिल्पे होती.
मय मंदिरांचे वैशिष्ट्य असं की दर ५२ वर्षांनी त्याची उंची वाढविली जात असे.जुने मंदिर तसेच ठेवून त्यावर नवीन मजला चढविला जात असे. खगोलशास्त्राच्या तत्वावर त्याची उभारणी होत असे. ४५ अंशात चढत जाणारे त्रिकोणक्षेत्र ,सूर्योदय आणि सूर्यास्ताची किरणे विशिष्ट कोनातून मंदिरात येण्याची योजना,पाय-या ,मूर्ती प्रकोष्ठ यांची ३६५ ही संख्या ही वैशिष्ट्ये. हे स्थापत्य अध्यात्मासह आकाश निरीक्षण,नक्षत्र अवलोकन आणि कालगणना यांच्याशी संबंधित होते.
याच मय समाजाला झाडे नावाने ओळखले जाते. हा समाज  प्रामुख्याने विदर्भातच जास्त प्रमाणात वास्तव्याला आहे

संदर्भ -भारतीय संस्कृृतीचा विश्वसंचार, भारतीय विचार साधना.

उत्तरार्ध
निर्माण करणारा (Manufacturer) शिलावट,कासार ,लोहार, सुतार, सोनार हा पाच कारागीरांचा उगम मानवी बौध्दीक उत्क्रांती नुसार होत गेला. हे पाच भावंड म्हणजेच पांचाळ बंधु नसून,एका भौगोलिक प्रदेशातून(पांचाळ) आलेला समाज म्हणजे पांचाळ. असेच वेगवेगळ्या समुदायासह वित भर पोटाची खडगी भरण्यासाठी भ्रमंती करणारा हा समाज आहे. आज देखिल त्यांचे हे स्थलांतर चालूच आहे. आपल्या कलेचा डंका त्याने मध्य अमेरीकत पण वाजवला हे देखिल आपण पाहिले.
कुठेही गेला तरी श्रमिक असणारा हा समाज जर कोणाला, उच्चवर्णिय, विश्वब्राम्हण वाटत असेल तर तो त्याचा भ्रम आहे. त्याने त्या स्वप्नरंजनात रमण्याचे व्यक्ति स्वातंत्र्य त्याला आहे. आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण मुळे त्यांच्यातील मुठभर आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सधन झाले असतिल याचा अर्थ तो उन्नत झाला असा नव्हे.
दुसऱ्या औद्योगिक क्रांती नंतर समाजवादाने (Socialism) जन्माधारीत जाती नष्ट होऊन नविन डॉक्टर, इंजिनिअर,शास्त्रज्ञ, वकिल, शिक्षक,प्राध्यापक, कामगार या अधुनिक व्यवसायधारीत जाती निर्माण व्हायला हव्या होत्या. परंतु तसे न होता 'जात ' जास्त प्रबळ होत आहे. एखादी बलात्कार ची घटना, भिमा कोरेगाव यासारख्या घटना मुळे जातीच्या भिंती जास्त पक्क्या होताहेत.
आणि चार वर्णातून शिल्लक राहीलेला एकमेव  ब्राम्हण वर्ण यात Ring master ची भूमीका बजावत आहे व या सर्व जातींना खेळवतोय हे आता प्रत्येकाने ओळखायला हवं.  दुर्दैवाने तसे होण्याला अजून खूप काळ जावा लागेल.आभ्यासात खूप तपस्या करून डॉक्टरी डिग्री मिळवण्यासाठी ६ वर्ष खर्ची घालणारा डॉक्टर ज्या दिवशी त्याच्या कॅबिन मध्ये भिऊ नकोस मि तुझ्या पाठिशी आहे व मी इलाज करतो तो बरे करतो अशा फोटो वा पाट्या लावणे बंद करून खरी डॉक्टरी जातीच पालन करेन. ज्या दिवशी शास्त्रज्ञ, इंजिनिअर उपकरणाला गंधन,चंदन, टिळा न लावता खरा वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून वैज्ञानिक जात प्रस्थापित करेल. गाडीला, घराला उलटी काळी बाहुली, लिबू, मिरची न बांधता आपला व्यवसाय हिच अधुनिक जात बनवेल.
तेव्हाच या जुन्या जन्माधारीत जाती नष्ट होतील व एकाच जातीअंतर्गत उच्चनिचतेचा अहंभावपण (Eg०)नाहीसा होईल उदाहरणार्थ सुतार समाजातच पांचाळ, अहिर, झाडे(मय) यांच्यातली श्रेष्ठत्वाचा दंभ नष्ट होईल.

समाप्त 🙏🏻

दिनेश मोरे- धुळे
९३७०९८४४८४